अभिनेत्री रूमा गुहा यांचे निधन

कोलकाता – जुन्या जमान्यातील अभिनेत्री व गायिका रूमा गुहा यांचे आज येथे निधन झाले. त्या 84 वर्षांच्या होत्या. त्यांचे झोपेतच प्राणोत्क्रमण झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. प्रख्यात गायक अमित कुमार यांच्या त्या मातोश्री होत. दिवंगत पार्श्‍वगायक किशोरकुमार यांच्या त्या एकेकाळच्या पत्नी होत्या.

सन 1950 मध्ये त्यांचे किशोरकुमार यांच्याशी लग्न झाले होते. त्यानंतरत आठ वर्षांनी त्या त्यांच्या पासून विभक्त झाल्या. त्यानंतर त्यांनी अरूप गुहाथाकुर्ता यांच्याशी विवाह केला. रूमा गुहा या स्वता अभिनेत्री होत्या. व त्यांनी सुमारे 60 चित्रपटांमध्ये काम केले आहे.

प्रख्यात दिग्दर्शक सत्यजीत रे यांच्या त्या भाची होत्या. रे यांच्या दिग्दर्शनाखालील चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. गंगा, अभिजान, पालातक, बालिका वधु, दादर किर्ती, 36 चौरंगी लेन, भालोबासा-भालोबासा हे त्यांचे बंगाली भाषेतील काही गाजलेले चित्रपट आहेत. ज्वार भाटा, मशाल, अफसर, रागरंग, अशा हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांना नृत्याची विशेष आवड होती. त्यांनी बंगाल मध्ये अनेक नृत्य महोत्सवही आयोजित केले होते.

त्यांच्या निधनाबद्दल पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सिनेमा आणि संगीत क्षेत्रात दिलेले योगदान कायम स्मरणात राहील असे ममतांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.