मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतप्रकरणी एनसीबीकडून अभिनेत्री “रिया चक्रवर्ती’ला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
दरम्यान, रियाला अटक झाल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असता. त्याविरोधात तिने जामीन अर्ज सुद्धा दाखल केला होता. मात्र, काही कारणास्तव रिया चक्रवर्तीचा जामीन अर्ज फेटाळला आणि रियाला 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी राहावं लागलं.
आज (दि. 22) रिया चक्रवर्तीची न्यायालयीन कोठडी पूर्ण होणार आहे. न्यायालयीन कोठडी पूर्ण झाल्यानंतर रियाला पुढील सुनावणीसाठी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं कळतंय. तसंच जर या प्रकरणी रिया दोषी आढळल्यास तिला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. 8 सप्टेंबर रोजी रियाला अटक केल्यानंतर तिची रवानगी भायखळा तुरुंगात करण्यात आली होती.