मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत चर्चेत असते. सुशांत प्रकरणी पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रियाचे नाव समोर आले होते. यानंतर तिला अटकही करण्यात आली होती. सध्या रिया जामिनावर असून तिच्या अडचणी कमी होत नसल्याचे दिसत आहे.
रियासह तिचे आई-वडील नवीन ठिकाणी शिफ्ट होणार असल्याचे समजते. मुंबईतील खार परिसरातील कुटुंबियांसह तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ड्रग्ज प्रकरणात तिचे नाव समोर आल्याने सोसाटीने तिला घर सोडण्यास सांगितले आहे. रिया चक्रवर्तीने ऑगस्ट महिन्यात आपल्या सोसायटीमधील एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात तिच्या इमारतीसमोर अनेक जण जमा होत असल्याचे दिसत होते.
यानंतर तिने मुंबई पोलिसांकडे संरक्षण देण्याचीही मागणी केली होती. दरम्यान, सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला 6 महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. या प्रकरणी सीबीआय, ईडी आणि एनसीबीकडून अद्यापही तपास सुरू आहे. तसेच ही आत्महत्या आहे की हत्या आहे, हेही सीबीआयकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.