#व्हिडीओ : झाडांच्या कत्तलीविरोधात अभिनेत्री प्राजक्ता माळीचा एल्गार

मुंबई- अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी 2,238 झाडे अखेर कापण्यात येणार आहेत. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांनी याविरोधात आरे परिसरात आंदोलन देखील सुरु केलं आहे.

दरम्यान, या आंदोलनात मराठी अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ने सुद्धा सहभाग घेतला आहे. झाडांच्या कत्तलीविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन प्राजक्ताने सोशल मीडियाद्वारे केलं आहे. या आंदोलनाचा व्हिडीओ प्राजक्ताने आपल्या इन्स्टाग्राम आकाउंटर पोस्ट केला आहे. “मेट्रो 3 फक्त निमित्त, पुढे तिथे बाजारीकरण होऊन सिमेंटची जंगलं उभारणार.. ही खरी भीती आहे”. असं प्राजक्ताने तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.