मुंबई – सलमान खान हा बॉलिवूडचा सर्वात लाडका बॅचलर मानला जातो. त्यामुळे नेहमीच त्याच्या अफेअरच्या चर्चा इंडस्ट्रीमध्ये सुरु असतात. आता भाईजानचे नाव त्याचा आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ मधील सह अभिनेत्री पूजा हेगडेसोबत जोडले जात आहे. सलमानसाठी त्याच्या लिंकअपच्या बातम्या सामान्य झाल्या आहेत, मात्र नुकतेच पूजा हेगडेने याप्रकरणी मौन तोडले आहे. एका कार्यक्रमात पूजाने याबाबत भाष्य केलं आहे.
सध्या पूजा हेगडे चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. यामुळेच पूजाची सलमान खानसोबतची केमिस्ट्री सध्या चर्चेचा विषय बनली आहे. यासोबतच दोघांच्या डेटींगच्या बातम्याही समोर येऊ लागल्या होत्या. जेव्हा सलमानने पूजाचा भाऊ ऋषभ हेगडेच्या लग्नाला हजेरी लावली तेव्हा याबाबतच्या जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या होत्या.
आता पूजा हेगडेने अफेअरच्या सतत येणाऱ्या बातम्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. पूजा हेगडेने एका मीडिया संवादादरम्यान दावा केला की ती सिंगल आहे आणि सध्या तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करते आहे. पूजा हेगडे म्हणाली, ‘यावर मी काय बोलू? मी माझ्याबद्दल अशा बातम्या मी वाचत राहते. मी सिंगल आहे मला सिंगल राहणे आवडते. मी सध्या माझ्या करिअरवर फोकस केला आहे. मी अशा प्रकारच्या अफवांकडे लक्ष देत नाही.
पूजा सलमानच्या चित्रपटाविषयी बोलायचे तर हा चित्रपट एप्रिलमध्ये ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात पूजा हेगडे आणि सलमान खान पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केले आहे.या चित्रपटाशिवाय पूजा हेगडे पुरी जगन्नाथच्या ‘जन गण मन’मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा आणि जान्हवी कपूर देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.