मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘पायल रोहतगी’ गेल्या काही दिवसांपासून आपल्या वादग्रस्त विधानामुळे जोरदार चर्चेत आहे. पायलने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पायल रोहतगीने स्वातंत्र्य सेनानी मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणारा व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या त्या वक्तव्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी पायलला अटक केली आहे. पायलने स्वत: ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.
I am arrested by @PoliceRajasthan for making a video on #MotilalNehru which I made from taking information from @google ? Freedom of Speech is a joke ? @PMOIndia @HMOIndia
— PAYAL ROHATGI & Team- Bhagwan Ram Bhakts (@Payal_Rohatgi) December 15, 2019
या वादग्रस्त व्हिडीओमध्ये पायलने मोतिलाल नेहरू यांच्या पाच पत्नी होत्या व जवाहरलाल नेहरू हे त्यांचे पुत्र नसल्याचे आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्या वक्तव्यानंतर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. काँग्रेस नेता चरमेश शर्मा यांनी तिच्याविरोधात राजस्थान पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिच्याविरोधात आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.
तत्पूर्वी, ‘राजा राममोहन रॉय’ तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळेच सर्व स्तरांमधून नेहमीच टीकेची झोड उठत असते. तिच्या पोस्टमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.