‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री त्याच्या ‘द व्हॅक्सिन वॉर’ या नवीन चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यांची पत्नी पल्लवी जोशीही या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचवेळी हैदराबादमध्ये शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांचा अपघात झाला आणि त्या जखमी झाल्या आहे. एका वाहनाचे नियंत्रण सुटून पल्लवी यांना धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेक अग्निहोत्री हैदराबादमध्ये ‘द व्हॅक्सिन वॉर’चे शूटिंगदरम्यान पल्लवी जोशी यांचा अपघात झाला. मात्र, त्यांना फारशी दुखापत झाली नसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शॉट देत असताना तोल गेल्याने एका वाहनाने त्यांना धडक दिल्याचे वृत्त आहे.
‘द व्हॅक्सिन वॉर’ COVID-19 चित्रपट वैद्यकीय बंधुत्व आणि शास्त्रज्ञांच्या समर्थन आणि समर्पणाला श्रद्धांजली अर्पण करते. कोरोना महामारीशी लढण्यासाठी बनवलेल्या लसीसाठी दोन वर्षांहून अधिक काळ रात्रंदिवस बलिदान देणाऱ्यांची सत्यकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट यावर्षी १५ ऑगस्टला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.