बॉलिवूडचे सर्वच कलाकार सध्या करोनामुळे सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहे. अनेक कलाकारांच्या चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलल्या गेल्या आहेत तर अनेकांनी शूटिंग थांबवले आहे. घरी मेड येत नसल्याने त्यांना स्वतःची काम स्वतःलाचं करावी लागत आहेत. भांडी घासण्यापासून ते फरशी पुसेपर्यंत अनेक सेलिब्रेटींचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एका बॉलिवूड अभिनेत्रीचा पडदे शिवतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी अभिनेत्री नीना गुप्ता सध्या सेल्फ क्वारंटाईनमध्ये आहेत. अशात त्यांचा कपडे शिवतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नीना यांनी स्वतःच हा व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात त्या खिडकीचे पडदे शिवताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये त्यांनी टेलरला घरी बोलवू शकत नसल्याने स्वतःच शिवणकाम करत असल्याचे सांगितले.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर काही दिवसांपूर्वी आयुष्मान खुरानाच्या “शुभ मंगल ज्यादा सावधान’मध्ये दिसल्या होत्या. या सिनेमातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. याशिवाय कंगानाच्या पंगामध्ये त्यांनी तिच्या आईची भूमिका साकारली होती. लवकरच त्या नेटफ्लिक्सवरील शो “मसाबा मसाबा’मध्ये आपल्या मुलीसोबत दिसणार आहेत.