शिकारी फेम ‘नेहा खान’ दिसणार ‘युवा डान्सिंग क्वीन’ च्या मंचावर 

अभिनेत्री नेहा खान हे नाव सध्या माहित नसेल अशी फारच थोडीथोडकी मंडळी महाराष्ट्र्रात असावी. कारणही तेवढंच तगडं आहे. बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी शिकारी फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या  चित्रपटामुळे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता. मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ शिकारी या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.

दरम्यान ‘झी युवा’वरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या सेलेब्रिटी डान्सिंग रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे अभिनेत्री नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता दिसणाऱ्या या कार्यक्रमध्ये नेहा प्रेक्षकांची शिकार करणार आहे. अभिनय तर ती उत्तम करतेच, तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवरही आहे. आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे ह्याचं ही दर्शन देणार आहे. सध्या ती डान्स चे वेगवेगळे फॉर्म्स च्या रिहर्सल रोज १२-१२ तास करत आहे. ज्यात कॉन्टेम्पररी आणि फोक डान्स यावर ती भरपूर फोकस करत आहे.

युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातील एंट्री बद्दल नेहा ला विचारले असता ती म्हणाली, “मला या सेलेब्रिटी डान्स कार्यक्रमात आपलं टॅलेंट दाखवण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे मला खरंच आनंद होत आहे. शिकारी हा सिनेमा आणि काळे धंदे ह्या वेब सिरीज मधून मी युथ च्या हृदयात नक्कीच बसले आहे पण आता मला सर्व वयोगटातील लोकांपर्यंत पोहोचायचं आहे.आणि मला वाटत माझं नृत्य हे माझं स्वप्न पूर्ण करेल.या युवा डान्सिंग क्वीन मुळे  मी माझ्या या सर्व फॅन्स च्या हृदयावर राज्य करिन  आणि ही ट्रॉफी सुद्धा जिंकीन अशी मला आशा आहे.” असं नेहा म्हणाली.

Leave A Reply

Your email address will not be published.