Neha Gadre | अभिनेत्री नेहा गद्रेला ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. यातील तिच्या गौरी नावाच्या भूमिकेला मोठी पसंती मिळाली. मात्र नेहा गद्रेने लग्नानंतर इंडस्ट्री सोडून परदेशी राहण्याचा निर्णय घेतला. नेहा सध्या पतीसह ऑस्ट्रेलियात राहते. मागील काही महिन्यांपासून नेहा तिच्या प्रेग्नन्सी शूटमुळे चर्चेत आहे. नेहा आणि तिचा नवरा ईशान बापट यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यानंतर नेहाने १७ फेब्रुवारी रोजी बाळाच्या जन्माची बातमी दिली. अभिनेत्रीला मुलगा झाला असून बाळाचे स्वागत करणारी पोस्ट तिने शेअर केली. नेहा आणि ईशान यांनी त्यांच्या बाळाचे नाव ‘ईवान’ असे ठेवले असून १० फेब्रुवारी रोजी त्याचा जन्म झाला. तिने या पोस्टमध्ये ‘बाळ ईवान, तुझे या जगात स्वागत आहे’, असे लिहिले आहे. नेहाने शेअर केलेल्या पोस्टनंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Neha Gadre |
नेहाने २०१९ मध्ये अभिनेत्रीने ईशान बापटसोबत लग्न केले आणि ती ऑस्ट्रेलियात स्थायिक झाली. बाळाच्या जन्माआधी लिंग चाचणी करणे भारतात बेकायदेशीर मानले जाते, मात्र परदेशात या गोष्टींनी परवानगी आहे. जेंडर रीव्हिल करताना पार्टीचे आयोजनही केले जाते. अशाच एका पार्टीत नेहा-ईशानने त्यांना मुलगा होणार असल्याचे सांगितले होते. ऑस्ट्रेलियामध्येच नेहाचे पारंपरिक पद्धतीने डोहाळे जेवण करण्यात आले होते. ज्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. Neha Gadre |
दरम्यान, ‘मन उधाण वाऱ्याचे’ या मालिकेशिवाय नेहा ‘अजूनही चांदरात आहे’ या मालिकेतही पाहायला मिळाली. तसेच तिने ‘मोकळा श्वास’ सिनेमातही काम केले होते. Neha Gadre |
हेही वाचा: