अभिनेत्री मौनी रॉय ही सर्वात लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने पती सूरज नांबियारसोबत करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती, ज्यात बॉलिवूड आणि टीव्ही जगतातील जवळपास सर्व स्टार्सनी हजेरी लावली होती. या पार्टीतील मौनी रॉयने तिचे लेटेस्ट फोटोशूट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती ग्लॅमरस दिसत आहे.
मौनीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अनेक ग्लॅमर्स फोटो शेअर केले आहेत. तिच्या या फोटोशूटमध्ये ती ग्लॅमरस थाई-हाय स्लिट गाऊनमध्ये दिसत आहे.
फॅशनच्या बाबतीत मौनी नेहमीच एक पाऊल पुढे असते. खुल्या केसांमध्ये आणि हलक्या मेकअपमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
मौनी रॉय तिचा पती सूरज नांबियारसोबत यावेळी रोमॅंटिक अंदाजात दिसून आली. ती गाऊनमधील लुक चाहत्यांना घायाळ करणारा आहे. या वर्षी 27 जानेवारीला गोव्यात मोनी आणि सुरजने लग्नगाठ बांधली. काही दिवसांपूर्वी मौनी आपल्या पतीसोबत कतारच्या दोहा शहरात सुट्टी घालवताना दिसली होती.