अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती दिग्दर्शक राज कौशल यांचे निधन; बॉलिवूडमध्ये हळहळ

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मंदिरा बेदी हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कारण मंदिर बेदीच्या पतीचे निधन झाले असल्याचे मोठी बातमी समोर आली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने दिग्दर्शक राज कौशल यांची प्राणज्योत मालवली असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. कारकिर्दीत त्यांनी तीन चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ आणि ‘अँथनी कौन है’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन राज कौशल यांनी केले आहे. तर माय ब्रदर निखिल, शादी का लड्डू आणि प्यार में कभी-कभी या सिनेमांची निर्मितीही त्यांचीच होती. राज कौशल यांच्या निधनाने बॉलिवूडमधील दिग्गजांनीही शोक व्यक्त केला आहे.

1999 मध्ये अभिनेत्री मंदिरा बेदी आणि राज कौशल यांचा विवाह झाला होता. दोघांचे लव्ह मॅरेज होते. 2011 मध्ये त्यांचा मुलगा वीर कौशलचा जन्म झाला. तर गेल्याच वर्षी त्यांनी चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले होते. तिचे तारा बेदी कौशल असे नामकरण करण्यात आले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Kaushal (@rajkaushal)


राज कौशल यांच्या मुलांनी गेल्या रविवारीच फादर्स डे निमित्त वडिलांसोबत सेल्फी शेअर केले होते. तर, राज कौशल यांनी रविवारी मित्रांसोबत पार्टीही केली होती. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपला वीकेंड अत्यंत शानदार गेल्याचेही त्यांनी सांगितले होते.

49 वर्षीय मंदिरा बेदीने 1994 मध्ये शांती मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवले होते. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्यानंतर क्योंकि सास भी कभी बहू थी, जस्सी जैसी कोई नहीं यासारख्या मालिकांतही ती झळकली. ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातून 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर बादल, शादी का लड्डू, मीराबाई नॉट आऊट यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.