नवी दिल्ली – हाथरस, भदोही येथे नुकत्याच घडलेल्या बलात्काराच्या घटनांनी उत्तर प्रदेश हादरले आहे हे खरे; किंबहुना पूर्ण देशच हादरला आहे. या घटनेमुळे उत्तरप्रदेशातील भाजप सरकारवर जोरदार टीका देशभरातून करण्यात येत असतानाच बलिया विधानसभा मतदसंघातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी हाथरस प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देताना मुक्तफळं उधळली.
आपल्या मुलींवर चांगले संस्कार घडवा. फक्त कायदा आणि शिक्षा बलात्कारासारख्या घटना रोखू शकत नाहीत. तर मुलींचे चांगले संस्कार बलात्कार रोखू शकतात. तसेच, मुलींवर चांगले संस्कार घडवणं त्यांना शालीन राहण्यास शिकवणं हे आई वडिलांचं कर्तव्य आहे”. असं भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे सुरेंद्र सिंह यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे.
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन आणि स्वरा भास्कर यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
Teach daughters how to not get raped??? Can he hear himself talk? THIS is the MINDSET that needs to change! Its so messed up! Why can’t they give some sanskaar to their sons??? https://t.co/JXj9Tx6YOe
— Kriti Sanon (@kritisanon) October 3, 2020
क्रिती सेनन म्हणाली, “मुलींना बलात्कार कसा होऊ नये हे शिकवा? त्यांना स्वत:ला तरी कळतंय का की ते काय बोलतायत? हीच मानसिकता बदलण्याची गरज आहे. संपूर्ण परिस्थितीच गोंधळलेली आहे. ते त्यांच्या मुलांना संस्कार का देऊ शकत नाहीत?’ अश्या आशयाचे ट्विट क्रितीने केलं आहे.
ये घटिया आदमी पुराना पापी है। #rapedefender BJP MLA Surendra Singh https://t.co/xq8WZxzKpO
— Swara Bhasker (@ReallySwara) October 3, 2020