मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, आता बॉलिवूडची पंगा क्वीन ‘कंगना राणावत’ हिला देखील करोनाची लागण झाली आहे.
View this post on Instagram
स्वतः हा कंगनाने यांदर्भात इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर माहिती दिली आहे. सध्या कंगना सेल्फ क्वारंटाईन आहे. कंगनाने सांगितले की “काही दिवस मला थकवा जाणवत होता. मी आपल्या गावी हिमाचल प्रदेशला रवाना होणार होती आणि यासाठी माझी करोना चाचणी करण्यात आली. आज त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला. दरम्यान, मला हे कळातच मी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. हा विषाणू माझ्या शरीरात आहे, हे मला काहीच माहिती नव्हते. आता मला माहित आहे की, मी यातून लवकरच पूर्णपणे बरी होईन”. असं कंगना म्हणाली.