अभिनेत्री कंगना झाली कोरोनामुक्त; म्हणाली, ‘कोणालाच नाही सांगणार यातून बरं होण्याचे खास सिक्रेट, कारण…’

मुंबई – अभिनेत्री कंगणा राणौतला काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण तिने आता कोरोनावर मात केली असून सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना या बाबतीची माहिती दिली आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करत तिने आपण निगेटिव्ह झालो असल्याचं सांगितलं आहे. मात्र, मी कशाप्रकारे कोरोनाला हरवलं हे सांगितलं तर अनेकांना वाईट वाटेल, त्यामुळे मी सांगणार नाही, अस म्हणतं तिने एक पोस्ट लिहिली आहे. पोस्ट मध्ये तिने लिहिलं आहे, ‘नमस्कार आज मी कोरोना निगेटिव्ह झाले. मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं, पण मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.’

 

पुढे कंगना लिहीते, ‘हो असे काही लोक आहेत ज्यांना कोरोनाविषयी वाईट बोलल्यास वाईट वाटते. असो तुम्हा सगळयांच्या आशिर्वादासाठी खूप खूप धन्यवाद. या कारणामुळे कंगनाने आपण काही बोलणार नाही असं म्हटलं आहे.’

दरम्यान काही दिवसांपूर्वी कंगना कोरोना संक्रमित झाली होती. तेव्हा त्याची माहिती तिने सोशल मीडियाच्या माध्यामातून दिली होती. हिमाचल ला जाण्यासाठी तिने टेस्ट केली असता तिला पॉझिटिव्ह रिपोर्ट देण्यात आला. त्यानंतर तिने घरीचं स्वतःला कॉरन्टाइन केलं होतं. तर आता तिने कोरोनावर मात केली आहे.

कंगणाचे ट्विटर अकाऊंच बंद झाल्यानंतर आता तिने इस्टाग्रामचा आधार घेतला आहे. कंगणा आता इन्स्टाग्रामवर आपले विचार मांडत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. विशेष म्हणजे कंगना राणौत तिच्या बिनधास्त वक्त्तव्यासाछी ओळखली जाते. आपल्या वक्तव्यांमुळे ती कायम सोशल मीडिया यूजर्सच्या निशाण्यावर असते. अलीकडेच कंगनाने तिच्या सोशल मीडिया स्टोरीवर इस्राइल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धासारख्या परिस्थितीवर आपले मत दिले होते. मात्र त्यानंतर नेटक-यांनी तिला इस्राइलबद्दल काहीच माहिती नाही, असे म्हणत ट्रोल करायला सुरुवात केली. पण शांत बसेल ती कंगना नाही. आता तिने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ (इस्राइयलबद्दलचा) शेअर करत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिले होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.