अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया “दबंग-3’मधून डेब्यू करणार असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र, ती या चित्रपटात काम करणार नसली तरी “श्रीदेवी बंगलो’मध्ये अरबाज खानसोबत ती झळकणार आहे. यामुळे जॉर्जिया अँड्रियानी पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
“श्रीदेवी बंगलो’ हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट असून यात तिने आयटम सॉंग केले आहे. यापूर्वी जॉर्जिया कधीही बॉलिवूडमध्ये झळकली नव्हती. एका मुलाखती दरम्यान त्याने सांगितले की, मी एक अतिशय उत्कृष्ट नृत्यांगना आहे. कथक आणि अन्य प्रकारचे नृत्य शिकण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. तसेच अरबाजबरोबर काम करणार असल्याने मी खूप नर्वस होती. कारण ज्यांना आपण जास्त ओळखत नाही त्यांच्यासोबत काम करणे सोपे असते, असेही तिने स्पष्ट केले.
दरम्यान, जॉर्जिया आणि अरबाज यांच्यातील संबंधाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा होत आहेत. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, तिने कधीही काम मिळविण्यासाठी अरबाजवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला नाही. तसेच अरबाजची निश्चितच मला मदत झाली असती. परंतु शेवटी मला स्वत:ला सिद्ध करावेच लागणार आहे, असे तिने सांगितले. दरम्यान, जॉर्जिया यापूर्वी श्रेयश तळपदे स्टारर “वेलकम तो बजरंगपुर’मध्ये झळकली होती.