अभिनेत्री डॉली बिंद्रावर मुंबईतील खार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. व्यायामशाळेतील कर्मचारी आणि तेथील लोकांना त्रास दिल्याचा डॉली बिंद्रावर आरोप आहे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना त्रास देणे. व्यायाम शाळेतील कर्मचारी तसेच इतर लोकांना सतत धमकावणे. आरडाओरडा करुन शांतताभंग करणे. अब्रूनुकसानीकारक मजकूर वितरित करणे, असे तिच्याविरोधातले आरोप आहेत.
दरम्यान, खार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, डॉलीला नोटीस पाठवली जाईल व त्यानंतर तिची चौकशी करण्यात येणार आहे. डॉली बिंद्रा ही “बिग बॉस’ या टीव्ही शो मधील माजी स्पर्धक आहे. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ती सतत चर्चेत असते. दरम्यान, डॉलीविरोधात नेमकी तक्रार कोणी दिली आहे, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
डॉलीवर गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधी साध्वी राधे मॉं हिनेही डॉली बिंद्रा हिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आताही तिच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून, लवकरच डॉली बिंद्रा हिला नोटीस बाजावणार असल्याचे वृत्त आहे.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा