हॉलीवूडमधील प्रसिद्ध गायिका, गीत लेखिका आणि अभिनेत्री डेमी लोवाटोने स्वतः विषयी एक मोठा खुलासा केला आहे. आपली लैंगिक ओळख नॉन-बायनरी असल्याचे डेमीने जाहीर केले आहे. डेमीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून या बद्दलची माहिती दिली आहे.
पुरुष आणि स्त्री असे दोन लिंगभेद रूढ आहेत. नॉन-बायनरी म्हणजे या दोन लैंगिक ओळखी व्यतिरिक्त तिसरी लैंगिक ओळख असणाऱ्या व्यक्ती.
या व्यक्ती पुरुषही नसतात आणि स्त्रीही नसतात. अशा व्यक्तींचा समावेश तृतीयपंथीमध्ये होतो. मात्र त्यातही अनेक प्रकार असतात. त्यापैकी नॉन-बायनरी हा एक प्रकार आहे.
डेमीने व्हिडिओसोबत पोस्ट केले की, रोज सकाळी आपण उठतो. तेव्हा आपल्याला जे व्हायचं असतं ते बनण्याची नवी संधी आपल्याला मिळत असते.
मी माझ्या आयुष्याचा बराचसा काळ तुमच्यासमोरच (चाहते) घालवला आहे. तुम्ही चांगल, वाईट आणि सगळंच पाहिले आहे. माझं जीवन माझ्यासाठीच एक सफर तर आहेच. पण कॅमेरासमोरच्या व्यक्तींसाठीही मी जगते.
आजचा दिवस असा आहे, की मी अभिमानाने माझ्याबद्दलची एक गोष्ट सांगू इच्छिते. मी नॉन-बायनरी आहे. स्वतःवर खूप कष्ट घेतल्यावर हे सांगणे शक्य झाले आहे.
ही गोष्ट तुम्हा सर्वांना सांगून मी माझ्या आयुष्यातली एक नाजूक गोष्ट सर्वांशी शेअर केली आहे, असे तिने लिहिले आहे.