अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ करोना पॉजिटीव्ह

मुंबई – भारतामध्येही दिवसागणिक करोना व्हायरसच्या प्रादुर्भाव वाढत आहे. या भयानक महामारीने देशात नव्हे तर संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड कलाकार या विषाणूच्या विळख्यात सापडेल असून, आता सिने अभिनेत्री “दीपिका पादुकोण’ हिला देखील करोनाची बाधा झाली आहे. दीपिकाच्या वडिलांना ‘माजी बॅडमिंटनपटू प्रकाश पादुकोण’ यांना रुग्णालयात दाखल केले, असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

तसेच दीपिकाची आई उज्ज्वला पादुकोण आणि बहिण अनिशा पादुकोण यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे.  इंटरनॅशनल इंडियन फिल्म अॅकॅडमी अवॉर्डच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. सध्या दीपिका बंगळुरु येथे सेल्फ क्वारंटाईन असून उपचार घेत आहे.

दरम्यान, यापूर्वी अभिनेता आमिर खान, मिलिंद सोमण, रणबीर कपूर, परेश रावल, कार्तिक आर्यन, अर्जुन रामपाल आणि अभिनेत्री आलिया भट्ट, पूजा हेगडे यांना करोनाची लागण झाली होती. करोना विषाणूचा हाच वाढता संसर्ग लक्षात घेता अनेक राज्यांत काही दिवसांकरता कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.