बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीची मुलगी अवंतिका दासानी चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच चाहत्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. अवंतिका बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असून चाहतेही तिच्या पदार्पणाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
भाग्यश्रीने पहिला चित्रपट मैंने प्यार किया हा सलमान खानसोबत केला होता आणि पहिल्याच चित्रपटापासून ती लोकांच्या मनात घर करून होती. आजही त्या चित्रपटाचे लोकं भरभरून कौतुक करतात. भाग्यश्रीचे या चित्रपटासाठी अजूनही कौतुक केले जाते. अवंतिकाही आता तिच्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी निघाली आहे.
अवंतिका तिच्या आईसारखी खूप सुंदर आहे आणि अनेक स्टार किड्सला प्रत्येक बाबतीत ती टक्कर देताना दिसून येत आहे. याशिवाय अवंतिका देखील सारा आणि जान्हवीसारखी निसर्गप्रेमी आहे आणि तिला निसर्गाच्या सौंदर्यात राहायला आवडते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती तिच्या ट्रीप आणि टूरचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते आणि तिच्या पोस्ट्स पाहून असा अंदाजही लावता येतो की तिला नवीन ठिकाणे एक्सप्लोर करायला आवडतात.
अभिनेत्री लाइमलाइटमध्ये येऊन फार काळ झाला नाही. पण तिचे आतापर्यंत 79 हजार फॉलोअर्स झाले आहेत. अवंतिका प्रसिद्ध दिग्दर्शक मीरा नायर, अनुराग कश्यप, फरहान अख्तर, पंकज त्रिपाठी, अमिताभ बच्चन, सान्या मल्होत्रा, रसिका दुग्गल आणि तापसी पन्नू या कलाकारांना फॉलो करते. यावरून अंदाज लावता येतो की ती तिच्या कलेबद्दल खूप प्रामाणिक आहे आणि आतापासून दिग्गजांना फॉलो करून त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
अवंतिका झी 5 वर प्रदर्शित होणार्या मिथ्या या वेब सीरिजमधून तिच्या करिअरची सुरुवात करणार आहे. यामध्ये अभिनेत्री हुमा कुरेशीही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अवंतिकाने ओटीटीमधून पदार्पण केले आहे आणि ती एक्सपोजरचा विचार करत आहे.