मुंबई – प्रसिद्ध अभिनेत्री आसावरी जोशी यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आसावरी जोशी यांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आसावरी जोशी म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मी प्रवेश केला. त्यांचे मी मनापासून आभार मानते. महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, चित्रपट आणि संस्कृतिक विभाग या पदी माझी निवड झालेली आहे. कलाकारांचे आणि जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन, असे त्यांनी सांगितले.