अभिनेत्री ‘अंकिता लोखंडे’ लवकरच अडकणार लग्नाच्या बेडीत

विकी जैनबरोबर लग्न ठरले असल्याचे तिने स्वतःच सांगितले

टीव्ही स्टार अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्यात 2018 पासून डेटिंग सुरू झाले होते. मात्र, या रिलेशनशिपच्या बातमीला अंकिताने 2019 मध्ये दुजोरा दिला होता. आता विकी जैनबरोबर लग्न ठरले असल्याचे तिने स्वतःच सांगितले आहे.

सुशांत सिंह राजपूतबरोबरच्या अफेअरमुळे तिच्या नावाची खूप चर्चा झाली होती. मात्र, सुशांतच्या मृत्यूनंतर तिच्या नावाची चर्चा कमी होत गेली. आता तो भूतकाळ मागे सोडून तिने आपल्या आयुष्याचा गांभीर्याने विचार केला आहे. विकी जैनच्या रूपाने तिला नवा जोडीदार मिळाला आहे.

आता ती विकीबरोबर लवकरच लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाची जोरात तयारी सुरू आहे आणि त्या सर्व तयारीबद्दल अंकिता खूपच एक्‍साईटेड आहे. विवाह ही खूपच आनंदाची बाब असते. विवाह समारंभ जयपूर-जोधपूरच्या स्टाईलने करण्याचा तिचा मानस आहे.

लॉकडाऊनच्या काळात विकीचे आपल्यावर निस्सीम प्रेम असल्याचे अंकिताच्या ध्यानात आले आहे. तिने विकीसाठी गुलाबजाम बनवले होते. पण ते अगदी खराब झाले होते. तरीही विकीने ते आनंदाने खाल्ल्याचेही अंकिताने सांगितले. यातूनच विकीचे खरे प्रेम दिसून आल्याचेही ती म्हणाली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.