ऍक्‍टर लोक डेटिंग करू देणार नाहीत- कृति सेनॉन

कृति सेनॉनच “अर्जुन पटियाला’ नुकताच रिलीज झाला आहे. अजून या सिनेमाला चांगले ओपनिंग मिळालेले नाही. मात्र कृति सेनॉनसह बाकी सर्व कलाकारांच्या ऍक्‍टिंगचे खूप कौतुक व्हायला लागले आहे. कृति सोशल मिडीयावर आपल्या रिलेशनशीपबाबत खूपच कमी बोलत असते.

मध्यंतरी एका इंटरव्ह्यूदरम्यान तिने आपल्या रिलेशनशीपबाबत एक गमतीशीर गौप्यस्फोट केला होता. जरी मी कोणाला डेट करायच विचार करत असले तरी वरुण शर्मा मला कोणाबरोबरही डेटिंग करू देणार नाही. कारण वरुण शर्मा कृतिच्याबाबतीत खूपच प्रोटेक्‍टिव्ह आहे. त्यामुळे तो कृतिला कोणाबरोबरही डेटला जाऊ देणार नाही. जरी कृतिने डेटिंग सुरू केले तरी ती याबद्दल कोणालाही काहीही सांगू शकणार नाही.

या डेटिंगबाबतची माहिती तिला स्वतः आणि स्वतःच्या अगदी जवळच्या निकटवर्तीयांपुरती मर्यदित ठेवायला लागणार आहे. कारण कोंणत्याही अनोळखी व्यक्‍तीने तिच्या रिलेशनशीपला जज करावे, असे तिला स्वतःलाही वाटत नाही. “अर्जुन पटियाला’मध्ये कृति सेनॉनबरोबर दलजीत दोसांज आणि वरुण शर्माही आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.