कलाकार पोहोचले चाहत्यांच्या घरी

मालिकेच्या रुपात चाहते त्यांच्या लाडक्या मालिकांमधील कलाकारांना दररोज भेटत असतात. पण या कलाकारांची प्रत्यक्ष भेट व्हावी ही इच्छा प्रत्येक चाहत्याच्या मनात असते. कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष भेट घेणं शक्य नसल्यामुळे स्टार प्रवाहने चाहत्यांसाठी एक अनोखी संधी उपलब्ध करुन दिली. ऑगमेंटेड रिऍलिटी या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने चाहत्यांना घरबसल्या स्टार प्रवाहच्या परिवाराला आभासी भेटता आला.

इतकंच नाही तर या परिवारासोबतच्या भेटीचा क्षण कॅमेऱ्यामध्ये कैदही करण्यात आला. मराठी टेलिव्हिजनवर असा प्रयोग आजवर झालेला नाही. त्यामुळे चाहत्यांकडून या अनोख्या उपक्रमाचं कौतुक होत आहे.

स्टार प्रवाहवरील सगळ्याच मालिकांना प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. अनिरुद्ध-अरुंधती, जयदीप-गौरी, सौंदर्या इनामदार, नंदिनी शिर्केपाटील, अंजी पश्या, दीपा कार्तिक, शुभम कीर्ती ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करत आहेत. त्यामुळे स्टार प्रवाहच्या परिवाराच्या या आभासी भेटीचा आनंद म्हणजे चाहत्यांसाठी अनोखी पर्वणी ठरली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.