नवी दिल्ली – अभिनेता विजय राज यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलीसांनी अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यातील एका हाॅटेलमधून विजय राज यांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर त्यांच्या सह अभिनेत्रीने विनयभंग केल्याचा आरोप केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय राज हे आपल्या टीमसोबत बालाघाटमध्ये होते. तेथे ते आगामी शेरनी चित्रपटाचे शुटींग करत होते. शुटींगदरम्यान विजय राज यांनी एका महिलेचा विनयभंग केला, असे पोलीसांनी सांगितले आहे.
अभिनेता विजय राज (फाइल फोटो) को कल गोंदिया से एक महिला क्रू मेंबर से कथित छेड़छाड़ के आरोप में गिरफ्तार किया गया। उनके खिलाफ एक मामला दर्ज़ किया गया है: अतुल कुलकर्णी, एडिशनल SP गोंदिया #महाराष्ट्र pic.twitter.com/1dTE1OvTjC
— ANI_HindiNews (@AHindinews) November 3, 2020
विजय राज यांनी अनेक हिंदी चित्रपटात काम केले आहे. रन चित्रपटातील कौवा बिर्यानी या सीनवरून त्यांना चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. त्यांनी धमाल, वेलकम, दीवाने हुए पागल, रघु रोमियो, मुंबई टू गोवा, गली बाॅय अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.