मुंबई – बॉलीवूड अभिनेता वरूण धवनने आपल्या दमदार अभिनयातून अल्पावधीतच चित्रपटसृष्टीत स्वतःची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वरूण धवनने या वर्षाच्या
सुरूवातीला जानेवारीत आपली गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत विवाह केला होता. नताशा ही एक फॅशन डिझायनर आहे. आता ती मनोरंजन क्षेत्रामध्ये आपले नशिब आजमाविणार आहे.
नताशा दलाल लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहे. ती एका फॅशनवर आधारीत असलेल्या शोमध्ये झळकणार आहे. या वेब शोचे नाव यस टू दा ड्रेस इंडियाफ असे आहे. यामध्ये
नताशा ही एका नववधुला लग्नासाठीचा जोडा खरेदीत मदत करताना दिसणार आहे. यासोबतच नताशा ही पहिल्यांदाच एखाद्या रियलीटी शोमध्ये आपल्या वेडिंग कलेक्शनचेही प्रदर्शन करणार आहे. हा शो डिस्कवरी प्लसवर दाखविण्यात येणार आहे.
दरम्यान, नताशा पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर येत आहे. नताशाने आजपर्यत कोणत्याही प्लॅटफॉर्मवर आपल्या खासगी आयुष्य, करिअर किंवा वरुण धवन संबंधी बोललेली नाही. नताशाने न्युयॉर्क येथील फॅशन इंस्टिटयूट ऑफ टॅक्नॉलॉजीमध्ये शिक्षण पूर्ण केलेले आहे.