Border 2 Shooting Started : 1997 साली आलेला ‘बॉर्डर’ चित्रपट आजही आवडीने पाहणारे अनेकजण आहेत. युद्धावर आधारित या चित्रपटातील पात्र, गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत. आता तब्बल 28 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच उत्तर प्रदेशातील झाशी येथे बॉर्डर-2 च्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली आहे.
अभिनेता वरूण धवनने या देशभक्तीपर अॅक्शन चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. वरूणचा सेटवरील फोटो समोर आला असून, यामध्ये वरूणने चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केल्याचे दिसत आहे. सोबतच, या चित्रपटाची रिलीज तारीख देखील समोर आली आहे.
सध्या झाशी येथील कॉन्टेन्मेंट भागामध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. चित्रपटाच्या शूट लोकेशनचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये अभिनेता वरूण धवनसोबतच, निर्माता भूषण कुमार, निधी दत्ता, सह-निर्माते शिव चनाना आणि दिग्दर्शक अनुराग सिंग दिसत आहेत. निर्मात्यांकडून हा चित्रपट 23 जानेवारी 2026 ला रिलीज होणार असल्याचीही घोषणा करण्यात आली आहे.
View this post on Instagram
1997 साली बॉर्डर हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामध्ये 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानची परिस्थिती दाखवण्यात आली आहे. यामध्ये सनी देओल, सुनील शेट्टी, जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना, सुदेश बैरी, पुनीत इस्सार, कुलभूषण खरबंदा, तब्बू, राखी, पूजा भट्ट आणि शर्बानी मुखर्जी अशी मोठी स्टारकास्ट होती.
बॉर्डरच्या सीक्वेलमध्ये अनेक नवीन कलाकार पाहायला मिळणार आहेत. आतापर्यंत अहान शेट्टी, दिलजीत दोसांझ आणि वरुण धवन या कलाकारांची नावे समोर आली असून, हा चित्रपट 1999 च्या कारगिल युद्धावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे.