अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीच्या ‘युध्रा’ची रिलीज डेट आउट

Yudhra Release Date | अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीचा ‘युध्रा’ सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. त्याच्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच शेअर करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये सिद्धांत हा त्याच्या अॅक्शन आवतारात दिसून येत आहे. या पोस्टरमुळे चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे. सिद्धांत चतुर्वेदी या चित्रपटात पहिल्यांदाच ॲक्शन करताना दिसणार आहे
2021 साठी ॲक्शन थ्रिलर चित्रपट ‘युध्रा’ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून या चित्रपटाची वाट पाहिली जात आहे. मात्र कोविड 19 मुळे याचे शूटिंग पुढे ढकलण्यात आले होते. अखेर तीन वर्षांनंतर हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होत आहे. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी युध्राची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. Yudhra Release Date |
View this post on Instagram
हा चित्रपट 20 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत असल्याचे सांगण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रवी उदयवार यांनी केले आहे. सिद्धांत चतुर्वेदीसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री मालविका मोहनन यात असणार आहे. यासोबत शेअर करण्यात आलेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सिद्धांत चतुर्वेदी आणि मालविका मोहनन दोघेही रक्ताने माखलेले दिसत आहेत. Yudhra Release Date |
दरम्यान, गली बॉय आणि गहराइयां सारख्या चित्रपटानंतर युध्रामध्ये सिद्धांत आपली कमाल दाखवण्यास सज्ज होणार आहे. युध्राशिवाय तो ‘धडक 2’मध्ये दिसणार आहे. 2018 मध्ये आलेल्या ‘धडक’चा हा सिक्वेल आहे. करण जोहर निर्मित चित्रपटात सिद्धांत तृप्ती दिमरीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. मालविकाबद्दल बोलायचे झाले तर ती प्रभासच्या ‘द राजा साब’ या चित्रपटात दिसणार आहे.
हेही वाचा:





