मुंबई – १ मार्च पासून देशात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात झाली आहे. ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण तिसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. नुकतंच अभिनेते ‘कमल हसन’ आणि ‘सतीश शाह’ यांनी देखील कोरोना लसीचा पहिला डोस घेतला.
View this post on Instagram
दरम्यान, आता या अभिनेत्यांच्या पाठोपाठ सैफ अली खानने देखील लस घेतल्याचे समोर आले आहे. सध्या सैफ अली खानचा लसीकरणादरम्यानचा फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतो आहे.
View this post on Instagram
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने काल कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. यावेळी सैफने खाकी रंगाची पँट आणि निळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता आणि तो रांगेत उभा राहून कोरोना लस घेण्यासाठी प्रतिक्षा करत होता.