राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटवर भडकला अभिनेता रणवीर शौरी

नवी दिल्ली- आंतरराष्ट्रीय योग (२१ जून) दिनाच्या दिवशी काँग्रेस अध्यक्ष ‘राहुल गांधी’ यांनी आपल्या ट्विटर आकाउंटरुन एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये भारतीय जवान आणि त्यांचे श्वान पथकाचा योग करताना दिसत असून राहुल गांधींनी या फोटोला ‘न्यू इंडिया’ असे कॅप्शन दिले आहे. आता या पोस्ट मुळे राहुल गांधींच्या अडचणी वाढतच चालत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

या ट्वीटवरून राहुल गांधींना सर्वच स्तरावरून नेटिझन्सने टार्गेट केले आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरी याने देखील या राहुल गांधींवर खोचक टीका केली आहे. “जेव्हा आपण आणि आपले कुटुंब राजकारण सोडले तेव्हा ‘न्यू इंडिया’ प्रत्यक्षात येईल” असं रणवीरने म्हंटल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.