गणेश विसर्जनानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार ‘हे’ मोठं काम…

पुणे – गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर आणि रस्त्याकडेला कचरा जमा होतो. त्याची स्वच्छता करण्याची जबाबदारी पुणे महानगरपालिका कर्मचारी दरवर्षी पार पाडतात.


गेल्या काही वर्षांत स्वच्छतेविषयी जनजागृतीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. अनेक स्वयंसेवी संघटना आणि नागरिक स्वयंस्फूर्तीने शहर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरतात. यात खारीचा वाटा म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी देखील गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर पुणे शहर स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरणार आहे. याबद्दल नागरिकांना आवाहन करणारा एक व्हिडिओ तिने शेअर केला असून तो खास ‘डिजिटल प्रभात’च्या वाचकांसाठी..

Leave A Reply

Your email address will not be published.