प्रयागराज: उत्तरप्रदेशातील प्रयागराजमध्ये १५ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याला सुरूवात झाली आणि आता काही दिवसांवर या कुंभमेळ्यास एक महिना पूर्व होत आहे. या महाकुंभ मेळ्यात देशातून आणि परदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक प्रयागराजमध्ये दाखल होते आहेत.
सिनेइंडस्ट्रीमधील अनेक कलाकारही प्रयागराजमध्ये दाखल होत आहेत. या महाकुंभात राजकुमार राव, पत्रलेखा, ईशा गुप्ता, हेमा मालिनी, अनुपम खेर, भाग्यश्री, रेमो डिसूझा आणि मिलिंद सोमणही, नीना गुप्ता आदी या कलाकारानंतर आता अभिनेता पंकज त्रिपाठी सपत्नीक कुंभमेळ्यात शनिवारी दाखल झाला आहे. पंकज यांनी त्रिवेणी संगमावर कुटुंबासमवेत पवित्र स्नान केले.
येथील वातावरण अध्यात्मिक आणि विलक्षण आहे. त्रिवेणी संगमात पवित्र स्नान करण्याची संधी मिळाल्याने मी खूप आनंदी आहे. देवाने आम्हाला या पवित्र स्थानाला भेट देण्याची संधी दिली आहे. आम्हाला संगमात डुबकी मारायची होती, त्यामुळे ती इच्छाही पूर्ण झाली. मला वटवृक्ष बघायचा होता आणि तो बघायला आला.
त्यांनी प्रयागराजमधील ट्रफिक समस्येवरही भाष्य केले. सकाळच्या विश्रांतीसाठी संगमात न्हाऊन निघालो. रात्री किल्ल्यावरील हवाई दृश्यही पाहिले. आता आपण निघू या, आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि खूप ट्रॅफिक आहे, अशी प्रतिक्रिया पंकज यांनी दिली.
पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या कुटुंबासह प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ २०२५ मध्ये त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केले. येथील वातावरण अप्रतिम आहे. मी माझ्या आयुष्यात यापेक्षा मोठी गर्दी कधीच पाहिली नाही. सरकारने ज्या प्रकारे एवढा मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामुळे मी प्रभावित झालो असल्याचे पंकज यांनी सांगितले.