अभिनेता मनोज वाजपेयीचे वडील रुग्णालयात दाखल; प्रकृती चिंताजनक

नवी दिल्ली – अभिनेता मनोज वाजपेयी यांच्या वडिलांना दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. परिवारातील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

वडिलांच्या प्रकृती अस्वास्थ्याबाबत माहिती मिळताच केरळ येथे एका चित्रपटासाठी शूटिंग करत असलेला मनोज वाजपेयी दिल्लीकडे रवाना झाला आहे.

मनोजने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याच्या वडिलांनी त्याला पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्यास कशाप्रकारे प्रोत्साहित केले याबाबतची माहिती दिली होती.

“वयाच्या १८ व्या वर्षी मी बिहार येथून दिल्लीत आलो. येथे मी दिल्ली विद्यापीठात प्रवेश घेतला. मी पदवी पर्यंत शिक्षण घ्यावे ही माझ्या वडिलांची इच्छा होती. मी अभिनयाचे स्वप्न साकारण्यासाठी शिक्षण अर्ध्यावर सोडून देऊ नये अशी त्यांची इच्छा होती. मला त्यांचं स्वप्न साकार करायचं असल्याने कशीबशी पदवी प्राप्त केली.” अशी आठवण मनोजने सांगितली होती.

दरम्यान, वडिलांच्या प्रकृतीबाबत मनोज वाजपेयीकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.