Hemant Dhome | काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास महाराष्ट्राची उपराजधानीत नागपूरात दोन गटात राडा झालेल्या घटनेनंर दंगलसद्दश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, औरंजेबाच्या कबर हटवण्याच्या मुद्यावरून दंगलसद्दश्य परिस्थिती निर्माणा झाल्याचे सांगितले जाते. या मुद्यावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरण चांगलचं तापल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रातील कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने दिला आहे. या मुद्यावरून दोन गटात घोषणाबाजी होऊन नागपूरातील महाल परिसरात ही घटना घडली. यानंतर आता यावर अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेन याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित शांतता आणि सलोखा जपण्याचे आवाहन केले आहे.
हेमंत ढोमचे पोस्ट
नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती! कृपया शांतता आणि सलोखा जपा! ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा! ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा! ते बरळतील, आपण विचार सांगायचा! शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा! अशी पोस्टर हेंमतने त्याच्या एक्स अकाउंवरून शेअर केली आहे.
नागपूरकर आणि महाराष्ट्रातील तमाम समजुतदार नागरिकांना कळकळीची विनंती!
कृपया शांतता आणि सलोखा जपा!
ते पेटवतील, आपण संयम ठेवायचा!
ते चिथवतील, आपण शांततातेचा मार्ग धरायचा!
ते बरळतील, आपण विचार सांगायचा!शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण जपायचा! #जय_महाराष्ट्र
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) March 18, 2025
नागपूरात नेमकं काय घडलं?
नागपुरात विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाने काल १७ मार्च रोजी आंदोलन केले. त्यानंतर संध्याकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान मोठ्या संख्येने एक गट महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोहोचला. या गटाने जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरूवात केली. त्यानंतर येथे दंगलसद्दश्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, पोलिसांना या घटनेची माहिती मिळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पोलिसांनी परिस्थिती ओटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.