Govinda Corona Positive | अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही करोनाची लागण

मुंबई – करोनाने संपूर्ण जगात हैदोस घातला आहे. बाॅलिवूडकरही करोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही करोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वारंटाईन असून त्यांनी स्वत: यासंदर्भात माहिती दिली आहे.

माझा करोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. मला सोम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची देखील करोना टेस्ट करण्यात आली आहे. त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. पत्नी सुनीताने काही दिवसांपूर्वीच करोनावर मात केली आहे. माझी प्रकृती ठिक असून गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, अशी माहिती गोविंदा यांनी दिली आहे.

दरम्यान, अनेक बाॅलिवूडकर करोनाच्या विळख्यात अडकल्याचे दिसते. अभिनेता अक्षय कुमारलाही करोनाची लागण झाली आहे. अक्षय कुमारने ट्विट करून सांगितले की, माझी कोविड चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकाॅल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी घरीच क्वारंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे.

दरम्यान, संजय लीला भंसाळी, आलिया भट्ट, रणबीर कपूर, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.