Aasif Sheikh | ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यातील कलाकारांच्या भूमिकेचे देखील कौतुक केले जाते. मात्र या मालिकेतील एक माहिती समोर आली आहे. या मालिकेत विभूती नारायणची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ शेख शूटिंग दरम्यान अचानक बेशुद्ध पडला. ज्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
समोर आलेल्या वृत्तानुसार, आसिफ शेख डेहराडूनमध्ये एका अॅक्शन सीनचं शूटिंग करत होता. यादरम्यान त्यांची प्रकृती बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. आसिफ शेखला तातडीने घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले. सेटवर उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर, अभिनेत्याला उपचारासाठी मुंबईत आणण्यात आले.
या वृत्तानंतर आसिफचे चाहते त्याला लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. मात्र अद्याप आसिफ शेख यांचे कुटुंबीय आणि ‘भाभी जी घर पर हैं’च्या निर्मात्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. Aasif Sheikh |
आसिफ शेखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने हम लोग, कयामत की रात, क्रिमिनल, इश्क में जीना इश्क में मरना, जमाना दिवाना, करण अर्जुन यासारख्या अनेक चित्रपटात काम केले आहेत. तो शेवटचे सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटात दिसला होता. पण आसिफ शेखला ‘भाभीजी घर पर हैं’ला मालिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली. हा शो २०१५ मध्ये सुरू झाला. Aasif Sheikh |
हेही वाचा:
Breaking News : खळबळजनक! दौंड शहरात दहा ते अकरा अर्भक आढळली; बेकायदा गर्भपात सेंटरची शक्यता