क्रिमिनल लॉयर, लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ यांची खास मुलाखत

प्रवीण तरडे यांची सडेतोड मुलाखत.

शेतकरी हा परमेश्वरा बरोबरचा, त्याला स्वतःचे जीवन संपविण्याचा अधिकार नाही. – प्रवीण तरडे. प्रवीण तरडे यांची सडेतोड मुलाखत.

Posted by Dainik Prabhat on Saturday, 22 December 2018

आपल्या दमदार चित्रपटांच्या जोरावर बहुचर्चित ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे लेखक, अभिनेते, आणि दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ यांनी मराठी प्रेक्षकांमध्ये आपले विशिष्ट स्थान निर्माण केले. आज मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवीण तरडे यांचे नाव आदराने घेतले जाते. चित्रपटाद्वारे समाजातील सामाजिक विषयांचे चित्र प्रेक्षकांना समोर मांडणारे लेखक, अभिनेता, दिग्दर्शक ‘प्रवीण तरडे’ यांनी क्रिमिनल लॉचे शिक्षण घेतानाच पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी पारितोषिक मिळविले होते. त्यांच्या मते, ”पुरुषोत्तम करंडक या स्पर्धेचे संस्कार चित्रपटांमध्ये चांगले वाटतात त्यामुळे या स्पर्धेत मानाची विविध पारितोषिके मिळविलेले अनेक कलाकार ‘मुळशी पॅटर्न’च्या निमित्ताने एकत्र आले आहेत.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दैनिक प्रभाताशी संवाद साधताना प्रवीण तरडे यांनी आपल्या आगामी चित्रपटाबद्दल अनेक सिक्रेट्स ओपन केली आहेत. प्रवीण सध्या ‘देऊळ बंद -२’ या चित्रपटावर काम करत असून हा सिनेमा बळीराजाच्या जीवनावर आधारित असणार असल्याचे प्रवीण यांनी दैनिक प्रभातला सांगितले. प्रवीण यांनी यावेळी बोलताना, “शेतकरी हा निर्माता असून, आपल्या संस्कृतीमध्ये निर्मात्याला देवाचे स्थान आहे. त्यामुळे या निर्मात्या शेतकऱ्याला आत्महत्येचा अधिकार नाही.” असे मत व्यक्त केले.

प्रवीण तरडे यांच्या बिंदास अभिनय, सामाजिक प्रश्नावरील लेखनाच्या वैशिष्ठ्यांमुळेच आज त्यांना मराठी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रियता मिळाली आहे. अशा क्रिमिनल लॉयर ते लेखक, अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची “दै. प्रभात’ने घेतलेली ही खास मुलाखत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)