अभिनेता दिनो मोरिआची 1.40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई – ईडीने म्हणजेच सक्‍त वसुली विभागाने संदेसरा ग्रुपच्या मनिलॉड्रिंग प्रकरणात चार जणांच्या संपत्तीवर टाच आणली आहे.

या चार जणांची एकूण 8 कोटी 79 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. त्यात अभिनेता दिनो मोरिआ याच्या 1 कोटी 40 लाख रुपयांच्या संपत्तीचा समावेश आहे.

अन्य जप्त मालमत्तांमध्ये संजय खान यांची तीन कोटी रूपयांची, अकिल बाचुअली यांची 1 कोटी 98 लाख रूपयांची आणि इरफान अहमद सादिकी यांची 2 कोटी 41 लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांना मोठ्या प्रमाणात फसवण्यात आल्याच्या प्रकरणात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने या प्रकरणात वरील कारवाई केली आहे.

संदेसरा ग्रुपने ही फसवणूक केली असून यातील रक्‍कम त्यांनी वरील व्यक्तींकडे वळवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे ईडीच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.