मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या कुटुंबातून अतिशय दु:खद बातमी समोर येत आहे. दिलीप कुमार यांचे धाकटे बंधू असलम खान यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून असलम खान यांच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते.
असलम खान यांना मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयसंबंधीत काही समस्यादेखील होत्या. ते 90 वर्षांचे होते. दरम्यान, आता असलम खान यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण कुटुंबीयांवर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
Aslam Khan, younger brother of veteran actor Dilip Kumar passed away early morning today. He had diabetes, hypertension and ischaemic heart disease and had tested positive for #COVID19: Lilavati Hospital, Mumbai #Maharashtra
— ANI (@ANI) August 21, 2020
तसेच, दिलीप कुमार यांचे दुसरे बंधू एहसान खान हे देखील कोरोना पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एहसास यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे.