आणखी एक तारा निखळला! अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल यांचं करोनामुळे निधन

Bikramjeet Kanwarpal dies due to corona : मनोरंजन क्षेत्रातील आणखी एका कलाकाराचे आज करोनामुळे निधन झाले. नामांकित सिने कलाकार बिक्रमजीत कंवरपाल (bikramjeet kanwarpal) यांचं आज करोनामुळे निधन झालं असून त्यांच्या जाण्याने चित्रपट सृष्टीमध्ये शोककळा पसरली आहे. ते ५२ वर्षांचे होते.

याबाबतची माहिती चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. ते लिहतात, “आज सकाळी मेजर बिक्रमजीत कंवरपाल (bikramjeet kanwarpal) यांचं करोनामुळे निधन झाल्याचे ऐकून दुःख झाले. ते सेवानिवृत्ती सैन्य अधिकारी होते त्यांनी अनेक चित्रपट व टीव्ही मालिकांमध्ये सहायक भूमिका साकारल्या आहेत. त्यांचे कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या दुःखात सामील आहोत.”

या चित्रपटांमध्ये साकारल्या भूमिका

भारतीय सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर वर्ष 2003 मध्ये बिक्रमजित कंवरपाल यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पेज ३, रॉकेटसिंगः सेल्समन ऑफ द इयर, रिझर्वेशन, मर्डर २, टू स्टेट्स आणि द गाझी अ‍ॅटॅक या सिनेमांमध्ये काम केले.

टीव्ही कार्यक्रमांमध्येही काम केले

चित्रपटांव्यतिरिक्त त्यांनी दीया और बाती हम, ये है चहेतें, दिल ही तो है यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.