मुंबई – मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते अरविंद धनू यांचे सोमवारी निधन झाले. उण्यापुऱ्या 47 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले आहे. अरविंद धनू यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला धक्का बसला आहे.
अरविंद धनू यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. त्यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘लेक माझी लाडकी’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘क्राईम पेट्रोल’ अशा काही मालिकांबरोबरच त्यांनी ‘एक होता वाल्या’ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे काय असतं’ ही त्यांची मालिका लोकप्रिय ठरली होती.