मुंबई – ‘मुन्नाभाई’ चित्रपटातील ‘सर्किट’च्या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेला बॉलिवूड अभिनेता ‘अर्शद वारसी’ यालाही वाढत्या वीज बिलामुळे शॉक बसला आहे. त्यामुळे अर्शदने आपल्या लाखभर रुपयाचे वीज बिल आल्याचे सांगत ट्विटरवर आगपाखड केली आहे.
‘हायवे लुटारु ‘अदानी’कडून आलेले हे माझे वीज बिल. ज्याला आमचे बिल बघून चांगलेच हसू येत आहे. 1,03,564.00 रुपये तुमच्या खात्यातून 5 जुलै 2020 रोजी डेबिट केले’ असे ट्वीट अर्शदने केले आहे. यावरून नक्कीच असे निदर्शनास येते की लॉकडाऊन काळात सामान्य जनतेबरोबरच कलाकारांच्या सुद्धा खिशाला कात्री बसली आहे.
We can understand your concern on the billing issue and are here to help you, but we do not appreciate the personal defamatory remarks and advise you to practice caution.
— Adani Electricity (@Adani_Elec_Mum) July 5, 2020
दरम्यान, याआधी अभिनेत्री तापसी पन्नू हिनेही वाढीव वीज बिलाची तक्रार ट्विटरवर केली होती. दरमहा येणारे 3800 रुपयांचे आणि यंदा आलेले 36 हजार रुपयांच्या बिलाचे फोटो तिने शेअर केले होते. “अदानी इलेक्ट्रिकल, आपण कोणत्या प्रकारच्या ‘पॉवर’साठी ही किंमत आकारत आहात?” असा सवाल तापसीने विचारला होता.
3 months of lockdown and I wonder what appliance(s) I have newly used or bought in the apartment only last month to have such an insane rise in my electricity bill. @Adani_Elec_Mum what kind of POWER r u charging us for? pic.twitter.com/jZMMoxDMgj
— taapsee pannu (@taapsee) June 28, 2020