अभिनेता अर्जुन रामपाल भारतातून होणार होता ‘नौ दो ग्यारह’, NCB च्या चार्जशीटमध्ये खुलासा

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात समोर आलेल्या ड्रग कनेक्‍शनमध्ये बॉलिवूडमधील अनेक नावे समोर येत आहेत. नारकोटिक्‍स कंट्रोल ब्यूरोकडून याप्रकरण कसून चौकशी सुरू आहे. यातच काही महिन्यापूर्वी अर्जुन रामपालचौकशीसाठी एनसीबी कार्यालयात  दाखल झाला होता. याबाबत एनसीबीने अर्जुनला समन्स बजावण्यात आला होता. 

यातपासा दरम्यान, आता नवीन माहिती समोर आली आहे. या माहितीनुसार अर्जुन रामपाल या कारवाई पासून बचविण्यासाठी NCB अशी शंका होती की अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तशा आशयाचे एक पत्रही NCB ने दक्षिण आफ्रिकेच्या काऊन्सलेट जनरलला लिहिले होते. NCB च्या चार्जशीटमधून हा खुलासा झाला आहे.

तत्पूर्वी,  एनसीबीने ड्रग्ज प्रकरणी अर्जुन रामपालच्या घरावर छापेमारी केली होती. याप्रकरणी एनसीबीने बुधवारी अर्जुन रामपाल लिव्ह इन पार्टनर गॅब्रिएला डिमेट्रिएड्‌स हिची देखील चौकशी केली. त्यानंतर आता अर्जुनला देखील चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. एनसीबीने  काही दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईत अर्जुन रामपाल याच्या घरातून काही बंदी असणारी मेडिसिन्स जप्त करण्यात आली आहेत. जप्त करण्यात आलेली ही औषधं एनडीपीएस कायद्याअंतर्गत येतात. याप्रकरणी अर्जुनच्या गर्लफ्रेंडची चौकशी झाली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील असे बरेच मोठे चेहरे एनसीबीच्या रडारवर आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.