Arjun Bijlani Accident| ‘नागिन’ या मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेला अभिनेता अर्जुन बिजलानीबाबत एक माहिती समोर आली आहे. अर्जुन बिजलानीचा अपघात झाल्याचे त्याने स्वत: सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे. अभिनेत्याने जखमी अवस्थेत फोटो देखील पोस्ट केली आहे. मात्र अपघात नेमका कसा झाला? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
अर्जुन आपल्या पत्नी आणि मुलासोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात गेला असताना त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्याचे फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. अनेकांनी अभिनेत्याच्या प्रकृतीची विचारणा देखील केली. पण आता अर्जुनची प्रकृती स्थिर आहे. मुंबईत परतल्यानंतर तो कामावर देखील हजर झाला आहे.
अर्जुन बिजलानी याने इन्स्टाग्रामवर पायांना दुखापत झाल्याच्या फोटोंचा कोलाज करत स्टोरीमध्ये पोस्ट केला. अभिनेत्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अपघात नक्की कसा झाला? याबद्दल अर्जुनने काही सांगितलं नाही. Arjun Bijlani Accident|
अर्जुन याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, ‘मिले जब हम तुम’, ‘परदेस में है मेरा दिल’, ‘नागिन’, ‘इश्क में मरजावां’, ‘रुहानियत’, ‘शिव-शक्ति’, ‘इंडियाज गॉट टैलेंट’ आणि ‘डांस दीवाने’ यांसारख्या मालिका आणि शोमध्ये काम केले आहे. याशिवाय तो सोशल मीडियावर देखील सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. Arjun Bijlani Accident|
हेही वाचा:
‘मी चुकीच्या माणसावर प्रेम केलं’ पवित्रा पुनियाने सांगितलं ब्रेक मागचं कारण