मुंबई – “डॅडी” या नावाने कुख्यात गॅंगस्टार अरुण गवळीची कन्या योगिता गवळीसोबत मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (दि. ८) विवाहबंधनात अडकणार आहे. गेल्या काहीदिवसांपूर्वी योगिता आणि अक्षयचा साखरपुडा झाला होता. जवळचे नातेवाईक आणि मित्र मंडळींच्या उपस्थितीत अक्षय-हा साखरपुडा पार पडला.
दरम्यान, या लग्न सोहळ्यात सोशल डिस्टन्सिंग सर्व नियम पाळले जाणार आहेत. एका प्रसिद्ध वृत्तानुसार अक्षय आणि योगिता यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरात असलेल्या दगडी चाळीतच पार पडणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीने लग्न होणार आहे. खरेतर हे लग्न 29 मार्चला होणार होते मात्र लॉकडाउनमुळे हे लग्न रद्द करावे लागले होते.
“मी योगिताला गेल्या पाच वर्षांपासून ओळखतो. आमच्या कुटुंबीयांनी आम्हाला विवाहबंधनात अडकण्याचा सल्ला दिला. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आम्ही दोघेही आनंदी आहोत’ असे अक्षय वाघमारेने मागे सांगितले होते.
अक्षयने फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप यासारख्या मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.