पुरग्रस्तांच्या मदतीला धावला अभिनेता अक्षय कुमार

कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीला आता बॉलिवूड चा सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमार धावून आला आहे.कोल्हापूर, सांगलीकरांनो धीर धरा, तुमचं आयुष्य पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल, अशा शब्दात खिलाडी अक्षयकुमारने पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे.

सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. तुमचं शहर, तुमचं गाव पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल. केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत. अशा शब्दात अक्षयकुमारने एक व्हिडीओ प्रसिद्ध करून पूरग्रस्तांना दिलासा दिला आहे. ‘सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रूप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे..तुमचं शहर, तुमचं गाव..पूर्वीपेक्षा आनंदी आणि समृद्ध होईल..केडीएमजी आणि मी आपल्या सोबत आहोत’.

कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरपरिस्थितीमुळे मोठे नुकसान झाले आहे. लढणे आन पुढे जाणे हे आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराजांकडून शिकलो आहोत. सरकार आणि कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेन्ट ग्रुप तुमच्या मदतीसाठी तत्पर आहे. मला विश्वास आहे की, आपला जिल्हा, आपली गल्ली पहिल्यापेक्षाही सुंदर आणि आनंदी होईल.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.