“चेन स्नॅचिंग’ची टोळी सक्रिय 

तळेगावात ज्येष्ठ महिलेच्या अडीच तोळ्यावर डल्ला 

तळेगाव दाभाडे – तळेगाव दाभाडे परिसरात सोनसाखळी चोरट्यांनी ठाण मांडले आहे. रविवारी (दि. 2) भाजी खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावल्यानंतर सोमवारी (दि. 3) पादचारी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. तळेगाव दाभाडे येथील मारूती मंदिर चौकात सोमवारी रात्री सव्वाआठच्या सुमारास हा प्रकार घडला. या घटनेनंतर महिलावर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणी सिंधू द्वारकानाथ निळकंठ (वय 62, रा. राव कॉलनी, तळेगाव दाभाडे, ता. मावळ) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी सिंधु निळकंठ या मारुती मंदिर चौकातून पायी राव कॉलनीकडे घराकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याची साखळी आणि अर्ध्या तोळ्याचा गंठण असा एकूण 70 हजार रुपयांचा ऐवज हिसकावून नेला. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विजय सपकळ तपास करीत आहेत.

महिलांनी सोन्या-चांदीचे दागिने परिधान करून एकट्याने फिरू नका. फिरत असताना कोणी पाठलाग करत नाही, याची खात्री करावी. नागरिकांनी संशयास्पद व्यक्‍ती अथवा वस्तुंची माहिती पोलिसांना द्यावी. तळेगावातील चोरीसंदर्भात परिसरातील “सीसीटीव्ही’चे फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. चोरट्यांना लवकरच सुगावा लागेल.

– सुधाकर काटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.