पुणे – करोना विषाणूचा प्रादुर्भाव थुंकणे, शिकणे आणि खोकल्यामुळे पसरतो. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर थुंकू नये, शिंकताना किंवा खोकताना नाका-तोंडावर रूमाल ठेवावा, असे आवाहन वारंवार केले जात आहे. मात्र, काही बहाद्दर रस्त्यावर थुंकत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रस्त्यावर थुंकणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली होती, ती पुन्हा प्रभावीपणे राबविण्यात यावी, असा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागांना दिले आहेत.
करोनापासून बचावासाठी स्वच्छता बाळगणे, वारंवार हात धुणे, उघड्यावर थुंकू नये. ही खबरदारी आहे. परंतु, काही थुंकी बहाद्दर पान, मावा, गुटखा खावून रस्ते, इमारतीच्या कोपऱ्यात पिचकाऱ्या मारतात.
दरम्यान, थुंकीमधून या विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होतो. ही थुंकी सुकली नाही तर पुढील काही तास या थुंकीतले विषाणू जिवंत राहतात आणि आजार बळवण्याची भीती असते.त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत स्वत:बरोबरच शहराचे आणि राज्याचे आरोग्य चांगले राहण्यासाठी रस्त्यावर थूंकू नये, असे आवाहन विभागीय आयुक्तांनी केले आहेत.