करबुडव्यांवर होणार कारवाई

पिंपरी (प्रतिनिधी) –शहरातील करबुडव्यांवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार असून कर बुडव्या मिळकतधारकांची चाचपणी करण्यासाठी पथकही नेमण्यात येत आहे. संपूर्ण मिळकतकर थकबाकीसह वेळेत भरावा, अन्यथा जप्ती किंवा दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा देण्यात महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून देण्यात आला आहे.

सहाय्यक आयुक्‍त स्मिता झगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नवीन मिळकती, वाढीव बांधकाम, अनधिकृत मिळकतीच्या कर आकारणीसाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. कराचा भरणा वाढविण्यासाठी अशा मिळकतींची मिळकत कर व करसंकलन विभागाच्या पथकांमार्फत चाचपणी होणार आहे.
पालिका हद्दीतील त्यांच्या नवीन मिळकती, वाढीव बांधकाम, अनधिकृत मिळकतीच्या कर आकारणीसाठी तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

मिळकतीच्या कर आकारणीसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांचे एक पथक 18 नोव्हेंबरपासून समक्ष वेगवेगळ्या भागात भेटी देणार आहे. या पथकांना सहकार्य करावे आणि संपूर्ण मिळकतकर थकबाकीसह वेळेत भरावा, अन्यथा जप्ती किंवा दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.