कांद्याच्या साठेबाजांवर होणार कारवाई

पुणे – कांद्याने 150 चा टप्पा गाठला आहे. त्यामुळे सर्वसामान्य हवालदिल झाले आहेत. त्यामुळे पुणे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी कांदा साठा केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिला.

राज्यात कांद्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे दर प्रतिकिलो 150 रुपयांवर पोहोचले आहेत. या दरवाढीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. घाऊक तसेच किरकोळ विक्रेत्यांना कांदा विक्रीची मर्यादा ठरविण्यात आली आहे. घाऊक विक्रेत्यांना 50 टक्‍के तर, किरकोळ विक्रेत्यांना 5 टक्‍के साठवणुकीची मर्यादा आहे. कांदा साठवणुकीवर मर्यादा आल्याने कांद्याचे दर नियंत्रणात येतील. तसेच कांदा साठेबाजीला आळा बसेल, असा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.